पेट्रोल, डिझेलची दरवाढ मागे घ्या! आम आदमी पक्षाची मागणी; पायदळ बाईक रॅली काढून विरोध प्रदर्शन

वर्धा : डिझेल पेट्रोलचे भाव सतत वाढत असल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहे. केंद्रातील मोदी सरकारने देशातील जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही त्यांना अच्छे दिनच्या नावाने केवळ स्वप्न दाखविले आणि आता सर्व जिवनावश्यक वस्तुंच्या किमती वाढल्याने जनता हैरान याहे त्यामुळे ही दरवाढ मागे घेन्याकरीता पायदळ बाईक रँली काढुन आम आदमी पार्टीच्या वतीने विरोध प्रदर्शन करण्यात आले.

पेट्रोल, डिझेल, गॅस स्वस्त करु असे आश्वासन केंद्रातील भाजपाच्या मोदी सरकारने देशातील जनतेला दिले होते. परंतु आज पेट्रोल डिझेल, गॅसचे भाव सतत वाढत असल्याने सामान्य गोरगरीब जनतेचे कंबरडे मोडले आहे. या भाव वाढीमुळे दररोज जनतेला लागणाऱ्या दैनंदिन वस्तूंचे भावही उच्चांक गाठत आहे. केंद्रातील मोदी सरकारने देशातील जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करा, या मागणीसाठी आज वर्धा जिल्हा आम आदमी पार्टीच्यावतीने जिल्हाध्यक्ष प्रमोद भोमले यांच्या नेतृत्वात निदर्शने करुन पैदल बाईक रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. आज सकाळी १ वाजताच्या दरम्यान शिवाजी चौकात केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करीत मोटरसायकल पायदळ रॅलीला सुरुवात करण्यात आली. यात मोठ्या संख्येने आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मंगेश शेंडे यांच्या नेतृत्वात या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here