

हिंगणघाट : उच्च प्राथमिक शाळा नांदगाव (बोरगाव) शाळेला ग्रामपंचायत नांदगाव (बो) मार्फत सेनिटायझर मशिन, थर्मल, ऑक्सीमिटर व एन 95 मास्कचा वितरण करण्यात आले. याप्रसंगी शाळेत सोशल डिस्टेसीग चे पालन करून मा.निलिमाताई पोगले सरपंच नांदगाव यांनी विद्यार्थ्यांना साहीत्याचे वाटप केले. साहीत्य वाटपाचे कार्यक्रमाला तंटामुक्ती अध्यक्ष हेमंत पोगले, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रेखा कापसे, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक सतिश घोडे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सौ. सिमा बेले यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता पदविधर शिक्षक उल्हासजी राठोड, कवडूजी कांबळे, शंकर मरसकोल्हे, ज्योतीताई महाबुध्दे, माया वाघमारे, मिनाक्शी घोडमारे यांनी सहकार्य केले.