दिव्यांग विद्यार्थीनीचा प्रहार तर्फे पुस्तके देऊन सन्मान

सेलू : तालुक्यातील केळझर येथील विद्यार्थीनी वैष्णवी शांताराम तेलरांधे हिने अडचणीवर मात करून दहावीचे परीक्षेत 69 टक्के गुण मिळवून यश संपादन केल्याने तिचा प्रहार अपंग क्रांती संघटनेचे वतीने पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले. संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील मिश्रा यांच्या हस्ते वैष्णवीला अब्दुल कलाम यांचे अग्नीपंथ सिंधुताई सपकाळ यांचे मी वनवासी हे दोन पुस्तक देऊन गौरव करण्यात आला यावेळी विदर्भ प्रमुख हनुमंत झोटींग, संपर्क प्रमुख अमोद क्षीरसागर, जिल्हा अध्यक्ष प्रमोद कुरहाटकर, चिंतामण कुभांरे, बजरंग शेंदरे, पळसराम नखाते, शांताराम तेलरांधे यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here