कामगार अधिका-यांनी 3 वर्षातील लाभार्थ्यांची यादी सादर करावी : पालकमंत्री सुनील केदार यांचे निर्देश

वर्धा : जिल्हा कामगार कल्याण कार्यालयात बांधकाम कामगारांची नोंदणी होऊन त्यांना विविध योजनाचा लाभ देण्यात येतो. मात्र बांधकाम कामगार नोंदणी संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त होत असून जिल्हा कामगार अधिकारी यांनी मागील तीन वर्षातील नोंदणी झालेल्या कामगारांची यादी नाव व पत्यासहित सादर करावी असे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिलेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांचा आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. आमदार रणजित कांबळे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, कामगार कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त उज्वल लोया, सहाय्यक आयुक्त एम पी मडावी, जिल्हा कामगार अधिकारी कौस्तुभ भगत उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री यांनी कामगार विभागाच्या कामाचा आढावा घेतला. यावर्षी जिल्ह्यात किती कामगारांची नोंदणी झाली, कोणत्या योजनांचा लाभ आतापर्यंत किती लोकांना देण्यात आला. याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. तसेच मागील तीन वर्षांत केलेल्या कामाचा अहवाल सुद्धा सादर करण्याच्या सूचना दिल्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here