रिपाइं (ए) आंबेडकर गटातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन! महेंद्र मुनेश्वर यांची प्रमुख उपस्थिती

वर्धा : भारतीय संविधानाचे शिल्पकार, क्रांतीसुर्य, विश्वभूषण, भारतरत्न,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त सिव्हिल लाईन वर्धा शहरातील मुख्य पुतळ्याला, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) “आंबेडकर” वर्धा जिल्हा कार्यकरिणी तर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) “आंबेडकर” जिल्हा कार्यालाय येथे जिल्हा अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये, कोरोना निर्बंधांचे नियम पाळून शिस्तबद्धपणे मिठाई व अल्पोपहाराचा कार्यक्रम संपन्न झाला. रिपाइंचे जिल्हा संघटक समाधान पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजू थुल, तालुका अध्यक्ष सुनील वनकर, जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष कैलास इंगळे, शहर अध्यक्ष बाबा उर्फ सूरज बडगे, जयकांत पाटील, प्रकाश कांबळे, राष्ट्रपाल गणवीर, सुभाष थुल, रमेश जामलेकर, धर्मपाल शंभरकर, गौतम डभारे, राजेश पाटील, सुरेश आगलावे, दिलीप पाटिल, अत्तुअली, प्रविण पोळके, प्रदिप मस्के, अरविंद भगत आदी पदाधिकारी व आंबेडकरी कार्यकर्ते अभिवादन कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here