
समुद्रपूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील बरबडी शिवारात झाला. या प्रकरणी सिंदी (रेल्वे) पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे.
अपघाताची माहिती मिळताच जाम महामार्ग मदत केंद्रातील पोलीस उपनिरीक्षक सुधाकर कुमरे, नरेंद्र दिघडे, गौरव खरवडे, किशोर येळणे, विनोद थाटे, निखिल वाडकर, दीपक जाधव यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. मृत व्यक्ती ४५ वर्षे वयोगटातील असून, मृतकाची ओळख पटविण्याचे काम सरू होते.




















































