
सिंदी(रेल्वे) : नजीकच्या पळसगाव (बाई) येथील सुमित सुधाकर भट (१८) याने २९ मार्चला स्वत:च्या शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. विशेष म्हणजे सुमित हा सिंदी (रेल्वे) येथील एका शाळेत बारावीचे शिक्षण घेत होता.
कोरोनामुळे शाळा बंद असल्याने सदर युवक स्वतःच्या शेतातील कामे करून दररोज सायंकाळी घरी येत होता. मात्र, घटनेच्या दिवशी सकाळी ११ वाजता शेताकडे गेलेला सुमित रात्री ८ वाजले तरीही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. दरम्यान, शेतातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सुमितचा मृतदेह आढळून आला.
ही बाब लक्षात येताच सिंदी पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची नोंद सिंदी पोलिसांनी घेतली आहे. असे असले तरी सुमितच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.



















































