हॉटेलमधून जप्त केला पेट्रोल-डिझेलसह दारुसाठा! गुन्हे शाखेतील पोलिसांचा छापा

वर्धा : शहरालगतच्या सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेलात छापा मारला असता अंमली पदार्थ तसेच पेट्रोल व डिझेलसह देशी विदेशी दारूसाठा आढळून आला. पोलिसांनी हॉटेल चालकावर गुन्हा दाखल करून अटक केली, ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली.

सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या धोत्र (रेल्वे) येथील जय महाकाली हॉटेलमध्ये छापा मारला असता आरोपी रत्नेश उर्फ पंडित सुखदेव तिवारी रा. ग्राम बरहुला पिजांतर, जि. रिवा. मध्यप्रदेश याच्या ताब्यातून १७० ग्रॅम गांजा, डबकीत ७० लीटर डिझेल, प्लास्टिक डबकीत १८ लीटर पेट्रोल तसेच देशी विदेशी दारूसाठा जप्त केला. तसेच आरोपीच्या ताब्यातून सहा हजार रुपये रोख असा एकूण 3१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरुद्ध सावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here