शेतकर्यांना सोयाबीन पिकाची एकरी ४० हजार रुपये आर्थिक मदत द्या! मनसेचे कृषि अधिकाऱ्यांना निवेदन

गिरड : सततच्या ढगाळी वातावरणामुळे कीड रोगाने हाती आलेले सोयाबीन पीक गेले यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांनी उभे पीक नष्ट केले आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एकरी चाळीस हजार रुपये आर्थिक मदत करावी अशी मागणी कृषी अधिकाऱ्यांना निवेदनातुन तालुका मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना शेंगा न भरलेले सोयाबीन पिक भेट करीत रोष व्यक्त केला. यावेळी मनसेचे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष सूभाष चौधरी, मनसे शेतकरी सेना वर्धा जिल्हा उपाध्यक्ष मनोज गिरडे,
समद्रपूर तालूका अध्यक्ष निलेश, खाटीक तालुका उपाध्यक्ष वासुदेव वैरागडे, अमोल मेंढूले, कवडूजी ब्राह्मणे, संदिप शिवनकर, राहुल गाडवे, अशोक डेकाटे व मनसे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here