पवनार बनतोय कोरोना विषाणू संसर्गाचा “हॉटस्पॉट’

पवनार : वाढत्या रुग्णसंख्येने पवनार हे तीर्थक्षेत्र कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ बनत चालले आहे. सोमवारी १५२ व्यक्तींची चाचणी केली असता १५ जण पॉझिटिव्ह. आढळले. रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर हा १० टक्‍क्‍यांच्या जवळपास आला आहे. यापूर्वी १८ ऑक्टिव्ह रुग्ण असल्याने रुग्णांची संख्या आता 33 झाली आहे. तीन कुटुंबांतील अख्खे सदस्य पॉझिटिव्ह निघाल्याने तो परिसर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे. येथे लसीकरण झालेल्यांची संख्या बोटांवर मोजण्याइतकी असून अल्प प्रतिसाद आहे.

४५ वर्षांवरील नागरिकांचा सर्व्हे करून त्यांना लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी आशा स्वयंसेविका मानधनाशिवाय सर्वेक्षणाचे काम करणार नसल्याने ग्रा.पं.चे कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्याकडून सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. दररोज किमान ५० व्यक्तींचे लसीकरण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मंगळवारी ५० व्यक्तींची नोंदणी करून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात लस देण्यासाठी घेऊन जाणार असल्याची माहिती ढमाळे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here