


नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. नरखेड येथील प्रचारसभा आटपून अनिल देशमुख येत होते. काटोल येथे तीनखेडा भिष्णुर मार्गाने परत येत असताना जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ देशमुख यांच्या कारवर अज्ञात व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली. या हल्ल्यात अनिल देशमुख यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे, तसंच त्यांच्या कारचंही नुकसान झालं आहे.















































