इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

समुद्रपूर : नजीकच्या दौलतपूर येथील ज्ञानेश्वर माधव आंदे (५५) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.

रोजमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार ज्ञानेश्वर हे घटनेच्या दिवशी घरी एकटेच होते. त्यांची पत्नी विवाहित मुलीची प्रकृती बरी नसल्याने मुलीच्या गावी गेली होती. अशातच ज्ञानेश्वर यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ज्ञानेश्वर यांच्या शेजारी राहणारे मनोज चव्हाण हे ज्ञानेश्वरच्या घरी गेले असता त्यांना ज्ञानेश्वरचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here