तहसिल कार्यालयात फेरफार अदालतचे आयोजन

वर्धा : महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी राज्य महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत वर्धा तहसिल कार्यालय येथे दि.9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत फेरफार अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.

नागरिकांनी फेरफार प्रलंबित असल्यास संबंधित तलाठी व मंडळ अधिका-यांची भेट घेऊन आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करुन फेरफार अदालतीचे दिवशी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसिलदार रमेश कोळपे यांनी केले आहे. फेरफार उपलब्ध अभिलेखावर नियमानुसार असल्याचे निष्पन्न होत असल्यास त्याच दिवशी प्रमाणित करण्यात येईल, असे तहसिल कार्यालयाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here