भरधाव ट्रकच्या धडकेत चारचाकी उलटली! तिघे जखमी

आर्वी : भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने समोरून येणाऱ्या चारचाकीला जबर धडक दिली. या अपघातात कार पलटली असून, कारमधील तिघे जण जखमी झाले. हा अपघात दिघी (होणाडे) फाट्याजवळ झाला.

हर्षल शंकर थोरात हा त्याचा मित्र सागर अजमिरे, कुणाल अजमिरे, शेख निहाल हे मुलगी बघण्यासाठी एम.एच. 33 अ. ४४५७ वाहनाने जात असताना समोरून भरधाव येणाऱ्या वाहनाने धडक दिली. यात कार उलटली असून, कारचे १ लाखाचे नुकसान झाले. तसेच कारमधील तिघेही जखमी झाले. याप्रकरणी आर्वी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास आर्वी पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here