मद्याच्या नशेत पाणी समजून घेतले फिनाइल! उपचारादरम्यान झाला मृत्यू

सिंदी (रेल्वे) : मद्याच्या नशेत पाणी समजून फिनाइल या विषारी द्रव्याचे प्राशन केल्याने मद्यपीचा सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सिंदी रेल्वे गावात घडली. याप्रकरणी २९ जून रोजी तक्रार दाखल करण्यात आली. प्रवीण अरविंद डफ (४५, रा. वॉर्ड १२) असे मृताचे नाव आहे. प्रवीण याला दारूचे व्यसन जडले होते. तो चोरुन लपून दारू पीत होता. २६ जून रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घरात बाटलीत ठेवलेले फिनाइल तो पाणी समजून प्यायल्याने त्याची प्रकृती बिघडली. त्याला सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डॉ. अनिरुद्ध अशोक वैद्य यांच्या तक्रारीवरून सिंदी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here