तालिबानचा क्रूर चेहरा! मृतदेह हेलिकॉप्टरला लटकवून शहरभर फिरवला


काबुल : तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून तिथे भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच अमेरिकन सैन्यांनी अफगाणिस्तान सोडल्यानंतर तालिबानचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.

तालिबानने अमेरिकेला मदत करणाऱ्या एकाला अत्यंत भयंकर शिक्षा दिली आहे. तालिबान्यांनी आधी या माणसाची हत्या केली, यानंतर त्याचा मृतदेह हेलिकॉप्टरला लटकवून शहरभर फिरवला. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका माणसाला अमेरिकन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरला दोरीच्या साहाय्याने बांधून लटकवले आहे. यानंतर त्याचा मृतदेह शहरभर फिरवला जात आहे. या व्यक्तीला अमेरिकेची मदत करत असल्यामुळे तालिबान्यांनी फाशी दिली, असे बोलले जात आहे. लोकांमध्ये दहशत निर्माण व्हावी म्हणून तालिबान्यांनी हे क्रूर कृत्य केलं असल्याचेही बोलले जात जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here