नोटीस देण्यास गेलेल्या वीज सहायकास मारहाण

वर्धा : कृषीपंप धारकांकडे थकीत असलेले देयके न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी नोटीस बजावण्यास गेलेल्या वीज सहायकाला धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला. नांदोरा येथे ही घटना घडली. केशुब बाटबर्वे हे मागील तीन वर्षांपासून वीज सहाय्यक म्हणून काम सांभाळतात. त्याच्याकडे मांदोरा,मांडवगड गावाचा कार्यभार आहे. गावातील कृषीपंप धारकांकडे थकीत असलेले बील त्यांनी न भरल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने याबाबचा नोटीस वाटप करण्यासाठी ते गावात गेले होते. ते नांदोरा गावात नोटीसची छाटणी करीत असताना गावात राहणारा चिंतामण अमोल चांदोरे हा तेथे आला आणि तुम्ही विनाकारण नागरिकांना नोटीस का देता असे म्हणून शिवीगाळ करू लागला. शिवीगाळ करण्यास हटकून केशुब हे नोटीस देण्यास गेले असता अमोलने शिवीगाळ करून मारहाण केली. अमोल चांदोरे याने अडथळा निर्माण केल्याने तक्रार दाखल केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here