रक्त आणण्यासाठी गेले अन्‌ जीव गमवून बसले! दोघे युवक ठार; भरधाव कार उलटली

आर्वी : प्राण वाचविण्यासाठी आवश्‍यक असलेला रक्तसाठा आणण्यासाठी गेलेल्यांची कार अनियंत्रित होऊन उलटली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी कुऱ्हा शिवारात घडली असून भूषण संजय चाफले (२१) रा. नांदपूर व मिलिंद पिंपळकर अशी मृतकांची नावे आहेत.

एका नातेवाईकाची प्रकृती जंभीर असल्याने त्यांचे प्राण वाचविण्यासाठी रक्ताची गरज निर्माण झाली, तोच रक्तसाठा आणण्यासाठी भूषण आणि मिलिंद हे दोघे एम. एच. ३२ ए. एच. ५६१७ क्रमांकाच्या कारने अमरावती येथे गेले होते. ज्या ठिकाणाहून रक्तसाठा घ्यायचा होता तेथेही रक्ताचा तुटवडा असल्याने भूषण चापले याने स्वतः दुपारी १.४८ वाजता एका खाजगी रुग्णालयात रक्तदान केले. त्याचे स्टेट्सही त्याने मोबाईलवर ठेवले.

रक्तच्या दोन बॉटल घेऊन परत येत असताना कुऱ्हा नजीक कार अनियंत्रित झाली. कारवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरु असताना वाहन उलटले. यात भुषण व मिलिंदचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here