दुचाकीचालकाची गुराख्याला धडक! गुराख्यासह दुचाकी चालकही जखमी

समुद्रपूर : येथील जाम ते चंद्रपूर मार्गावरील आरंभा टोलनाक्याजवळ दुचाकीचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गुराख्याला जबर धडक दिली. यात. गुराख्यासह दुचाकी चालकही जखमी झाला. हा अपघात मंगळवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आल्याने जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

धनराज देवराव भटे (५५) रा. आरंभ्रा, असे गंभीर जखमी झालेल्या गुराख्याचे नाव आहे. मयुर रामचंद्र चत्रे (२८) रा.भद्रावती हा एम.एच.38 ए. क्यू. ४०३३ क्रमांकाच्या दुचाकीने जामकडून चंद्रपूरकडे जात होता. आरंभा शिवारात धनराज भटे हे रस्त्याच्या बाजूला उभे राहून गुरे चारत होते. या दरम्यान मयुरने निष्काळजीपणे वाहन चालवून रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या धनराज भटे या गुराख्याला जबर धडक दिली. या अपघातात गुराख्याच्या डोक्याला आणि पायाला जबर दुखापत झाली. तसेच दुचाकीचालक मयुरही जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक संतोष सपाट, सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत, गौरव खरवडे, अजय बेळे, सुधाकर बावणे, आशिष धमाणे, सुनील श्रीनाथ, प्रदीप डोंगरे, गणेश पवार आदींनी घटनास्थळी धाव घेवून आरंभा टोलनाक्याच्या रुग्णवाहिकेव्दारे दोन्ही जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्त दुचाकी बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहे.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here