अज्ञात वाहनाच्या धडकेत व्यक्ती ठार

वर्धा : अज्ञात वाहनाने पादचारी व्यक्तीस धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. शांतीनगरकडे जाणाऱ्या सावंगी वळण रस्त्यावर हा अपघात झाला. अजय प्रभाकर गुडे (रा. गौरक्षण वॉर्ड) हा सायंकाळी सात वाजताच्या सुमारास दारू पिण्यासाठी वळण रस्ता ‘परिसरात आला होता. मद्यप्राशन करून तो पायदळ जात असताना मागाहून येणाऱ्या भरधाव वाहनाने त्याला धडक दिली. यात अजयचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी सावंगी पोलिसांनी नोंद घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here