दागिने पळविणारी त्रिसदस्यीय महिलांची टोळी जेरबंद! ३७,८६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

वर्धा : गर्दीच्या ठिकाणी हातचलाखी करून मौल्यवान साहित्यासह दामिने पळविणाऱ्या त्रिसदस्यीय टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. भिका अनिल नाडे (४२), सपना सागर हातागाडे (२७) व आशा संजय नाडे (४८) सर्व रा. नेताजीनगर झोपडपट्टी यवतमाळ अशी अटक केलेल्या आरोपी महिलांची नावे. असून त्यांच्याकडून ३७ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सेवाग्राम पोलीस स्टेशन येथे दाखल चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून केला जात असताना खात्रीदायक माहितीच्या आधारे पोलिसांनी यवतमाळ जिल्ह्यातील काही महिलांना ताब्यात घेत विचारपूस केली. दरम्यान, सदर तीन महिलांनी चोरीची कबुली दिली. या महिलांकडून पोलिसांनी पोत, चेन टॉप्स आदी साहित्य असा एकूण ३७ हजार ८६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या तिन्ही चोरट्या महिलांना पुढील कार्यवाहीसाठी सेवाग्राम पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here