रुग्णालयातून दुचाकी पळविणारे जेरबंद! वाहन जप्त; शहर पोलिसांची कामगिरी

वर्धा : कोविड टेस्ट करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात गेलेल्या महिलेची दुचाकी चोरून नेणाऱ्या दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. ऐबाज शेख युसुफ शेख (२१) रा. पुलफैल व आफताब अली सैय्यद अख्तर अली (२१) रा.तारफैल असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून, त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीची दुचाकी जप्त केली आहे.

पोलीस सूत्रानुसार, तरुणा खेडकर रा.सोनेवाडी या कोविड चाचणी करण्यासाठी एम.एच. 3२ ए. पी. ४९६४ क्रमांकाच्या दुचाकीने पतीसोबत सामान्य रुणालय वर्धा येथे गेल्या होत्या. दरम्यान, रुग्णालयाच्या आवारात उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी तक्रारीवरून गुन्हा दाखल होताच, शहर पोलिसांनी तपासाळा गती देत, गोपनीय माहितीच्या आधारे ऐबाज शेख युसूफ शेख व आफताब अली सैय्यद अख्तर अली यांना दयालनगर येथून ताब्यात घेतले. विचारपूस केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीची दुचाकी जप्त केली आहे. ही कारवाई शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनात सचिन इंगोले, शशीकांत जयस्वाल, दीपक जंगले, राजेंद्र ढगे, सलमान शेख यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here