कारच्या धडकेत दोघे गंभीर! तळेगाव-आष्टी मार्गावर अपघात

आष्टी शाहिद : दोन कारची समोरासामोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही. घटना तळेगाव- आष्टी मार्गावर मंगळवार 12 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. 12 एप्रिलला दुपारी 3 वाजताच्या सुमारास तळेगाववरुन अष्टीमार्गे वरुडला जाणारी गाडी क्रमांक एम. एच.20 सी.एच.4387 व आष्टी वरून अकोला जाणारी कार क्र. एम. एच. 30 बी. बी.3858 ची बँक ऑफ इंडियापासून काही अंतरावर आमने सामने धडक झाली. यात दोन्ही गाड्यांचा समोरील भाग चेंदामेंदा झाला असून, तवेरा गाडीत असलेले एक महिला व युवक प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. घटनेची माहिती आष्टी पोलिसांना देण्यात आली. जखमींची नावे कळू शकली नाही. पुढील तपास आष्टी पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here