सेवाग्राम रुग्णालयातून पसार आरोपी कर्नाटकात सापडला! हिंगणघाट पोलिसांची कारवाई

वर्धा : ईराणी टोळीतील चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपी मोहम्मद शब्बार मोहम्मद शाबिर वय १९ , जाहिराबाद, तेलंगाना ला वर्धा येथील कारागृहात असताना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे उपचारासाठी त्याला कस्तुरबा रुग्णालय, सेवाग्राम येथे नेण्यात आले. आरोपीने या संधीचा फायदा घेत रुग्णालयातील कोविड विभागातून दिनांक २२ एप्रिल रोजी पसार झाला.

गुप्तचर विभागाच्या माहितीवरून आरोपी हा दुरवर पळाला असल्याचे शोध पथकाला कळविण्यात आले. त्याच्या शोध मोहीमेची जबाबदारी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी हिंगणघाट पोलीसांना दिली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संपत चव्हाण, प्रगटीकरण पथकाचे प्रमुख शेखर डोंगरे, निलेश तेलरांधे, सचिन घेवदे, विशाल बंगाले, सचिन भालशंकर आदी सहकाऱ्यांच्या सहयोगाने आरोपीस बिंदर, कर्नाटक राज्यातून स्थानिक पोलीसांचे सहकार्य घेऊन अटक केली. त्याला पुढील कारवाईकरीता सेवाग्राम पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here