शेतातील विहिरीत उडी घेत तरुण शेतकऱ्याची आत्महत्त्या ; परिसरात हळहळ व्यक्त

पवनार : रात्रीच्या सुमारास शेतात पिकाची राखण कराला जातो असे सांगत घरुन गेलेल्या तरुण शेतकऱ्याने दोराने हातपाय बांधून शेतातील विहिरीत उडी घेत आत्महत्त्या केल्याची घटना शनिवार (ता. २५) सकाळी उघडकीस आली. प्रवीण रामेश्वर बोरकर वय ४२ वर्षे रा. पवनार असे आत्महत्त्या करनाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

शुक्रवारी दिवसभर शेतात हरबरा काढून घरी आल्यानंतर जेवण करून शेतात काढुण ठेवलेल्या हरबऱ्याची जंगली प्राण्यांपासुन राखण करायला जात असल्याचे घरी सांगून निघाल्यावर सकाळी उशीरापर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी प्रविनची शोधाशोध केली असता त्याने शेतातील विहिरीत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच सेवाग्राम पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करुन मृतदेह विहिरीतून बाहेर काढला आणि उत्तरीय तपासनिकरीता सेवाग्राम येथील कस्तूरबा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here