वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार! सालोड रेल्वे ओव्हरब्रिजवळील घटना; अज्ञाताविरोधात गुन्हा

वर्धा : भरधाव वेगात येत असलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने या अपघातात दुचाकीवरील 29 वर्षीय युवक जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी रात्री 8.30 वाजताच्या दरम्यान, सालाेड जवळील रेल्वे ओव्हर ब्रिजजवळ घडली. मृत युवकाचे नाव निखील दादाराव गहुकार असे आहे.

पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाचणगांव येथील निखील गहुकार हा युवक वर्धा येथे खासगी संस्थेत कार्यरत होता. कार्यक्रम असल्यामुळे तो आपल्या गावी नाचणगांव येथे गेला होता. तेथे काही महत्वाच्या कामानिमित्त त्याच्या वरिष्ठांचा फोन आल्यामुळे निखिल रात्रीच आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच. 32 ए.एफ. 0420 ने वर्धा येथे येण्यासाठी निघाला. दरम्यान, नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर सावंगी पोलिस ठाणे हद्दीत रेल्वे ओव्हरब्रिजजवळ विरुध्द दिशेने येत असलेल्या अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, निखील दुचाकीसह बराच दुरपर्यंत घसाटत गेला. त्यामुळे निखिलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच दुचाकीही क्षतीग्रस्त झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here