समृद्धी महामार्गावरील बांधकाम साहित्य चोरट्यांकडून दिवसाढवळ्या ल॑पास! कंत्राटदार कंपनीची तक्रार; पोलिसांकडून संथगतीने तपास

विरूळ (आकाजी) : परिसरातील रसुलाबाद, बोरी, हुसेनपूर, निजामपूर टाकळी, पिंपळगाव आदी गावांलगत समृद्धी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महामार्गचे ८० ते ९० टक्के काम झाले असून अंतिम टप्प्यात आले आहे. रस्त्याचे व पुलाचे बांधकाम करताना अनेक लोखंडी रॉड व इतर महत्त्वपूर्ण साहित्य या बांधकामाच्या ठिकाणी पटून आहे. भुरट्या चोरांकडून महामार्गाच्या कामावरील हे साहित्य लंपास केले जात आहे.

दिवसाढवळ्या लोखंडी रोंड व इतर साहित्याची चोरी झाली असल्याचे संबंधित कंपनीच्या लक्षात येताच अधिकाऱ्यांनी पुलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणतीही चौकशी केलेली नाही. यामुळे चोरट्यांचे मनोबल उंचावले असून दररोजच या परिसरातून काही ना काही साहित्य चोरीला जात असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांभितले. जेव्हापासून या परिसरात समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाले, तेव्हापासून मोठ्या प्रमाणात वाहनांमधून लाखो रुपयांच्या डिझेलची चोरी होत आहे.

चोरटे हे पहाटेच मोठमोठे ड्रम भरून परिसरात आणि लगतच्या गावात डिझेलची विक्री आहेत. यामुळे संबंधित कंपनीला लाखो रुपयांचा चुना लागत आहे. पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. या चोरीच्या व्यवसायातून अनेकांनी आर्थिक उन्नती साधली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here