१५० फूट खोल दरीत कोसळला ट्रक! सत्याग्रही घाटातील घटना; दोघे जखमी

वर्धा : राष्ट्रीय महामार्गावरील सत्याग्रही घाटातील वळणावर २२ एप्रिलच्या रात्री १.३० वाजताच्या सुमारास ड्रायव्हरला झोपेची डुलकी आल्याने ट्रक दरीत १५० फूट कोसळला. सुदैवाने या अपघातात जीवीत हानी झाली नाही, परंतु चालक व त्याचा सहकारी जखमी झाले आहे.

भंडारा येथून राजकोटला जी.जे.०३ बी. व्ही.३६९९ क्रमांकाचा ट्रक रात्री १.३० वाजताच्या सुमारास सत्याग्रही घाटातुन लोखंडी रॉड घेऊन जात होता. तेव्हा चालकाला झोपेची डुलकी लागल्याने ट्रकचे संतुलन बिघडून ट्रक सत्याग्रही घाटातील वळणावरील १५० फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात ट्रक चालक महम्मद तय्युम सलामुद्दीन रा रीवा. मध्यप्रदेश व त्याचा सहकारी हे दोघेजण जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक पवण भांबुरकर, पोलीस शिपाई संजय शिंगणे, रोशन करलुके, देवेंद्र गुजर यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना आर्वी ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. या प्रकरणी तळेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास तळेगांव पोलीस करीत आहे.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here