
वर्धा : दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला. निर्मल बेकरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली. प्रतिभा घडे ही भामटीपुरा परिसरात असलेल्या कपड्याच्या दुकाना समोरून जात असताना साईमंदिरकडून दुचाकीवर भरधाव आलेल्या अनोळखी दोघांनी महिलेच्या गळ्यातील ५ ग्रॅम वजनाची सोनसाखळ हिसकावून पळ काढला. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.



















































