मौदा शहरात कोरोना चा शिरकाव; मौदा शहरात एक तर NTPC येथे कार्यरत कामगार कोरोना पाँजिटीव

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

मौदा /नागपुर :१३ जुलै २०२०
नागपुर जिल्ह्यातील मौदा शहरात सध्या कोरोना चा शिरकाव झाला असुन आज दोन पेशंट पाँजिटीव असल्याचे व्रृत्त समोर आले आहे.
मौदा तालुका तहसीलदार प्रशांत सांगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार युपी जिल्ह्यातील बलिया येथून एक ४७ वर्षिय व्यक्ती काल मौदा येथील शिवनगर काँलनी, (गैलेक्सी हाँटेल समोर) येथे आला होता. त्याचे स्वैब नमुने आज सकाळी तपासणी साठी पाठवले असता त्याचा रिपोर्ट आज पाँजिटीव आला असुन त्याला मेयो मध्ये भर्ती करण्यासाठी स्थानिक प्रशासन पोहोचले आहे. मौदा तहसिल, नगरपरिषद, तसेच एसडीओ कार्यालय चे अधिकारी व कर्मचारी शिवनगर काँलनी परिसरात पोहोचले असुन त्या परिसरास सील करण्यास व सेनिट्राईज करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

एसडीओ शाम मदनुरकर यांनी काढला शिवनगर भोवतालचा परिसर प्रतिबंधित केल्याचा आदेश
यासंदर्भाने मौदा येथील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) शाम मदनुरकर यांनी अतितात्काळ एक आदेश काढुन न्यु शिवनगर , विशाल सायकल स्टोर्स, शिवनगर काँलनी, रामटेक रोड, यामध्ये येणारे क्षेत्र प्रतिबंधित घोषित केले असुन केवळ शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना प्रवेश ,तसेच या परिसरातील मेडिकल स्टोर्स, दवाखाना तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मौदा NTPC चा एक कामगार कोरोना पाँजिटीव

मौदा NTPC चा एक कामगार हा कोरोना पाँजिटीव असल्याचे व्रृत्त असुन हा कामगार कन्हान येथील रहिवासी असुन तो कन्हान हुन मौदा NTPC येथे अपडाऊन करतो. हा कामगार मशिन आँपरेटर असल्याचे समजते. हा कामगार कोरोना पाँजिटीव निघाल्याने मौदा NTPC मध्ये एकच खळबळ उडाली आहे. मौदा NTPC मध्ये या कामगारांच्या संपर्कात आलेल्या सर्व कामगारांना तसेच तो ज्या विभागात कार्यरत होता तो परिसर अद्याप पर्यंत सेनिट्राईज झाला नसल्याची माहिती आहे. अजुन पर्यंत मौदा NTPC तर्फे यासंदर्भात कुठलीही माहिती प्रशासनाने दिलेली नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here