वरुड शिावारात चार मोर मृतावस्थेत! दोन मोरांवर करुणाश्रमात उपचार सूरु

राहुल खोब्रागडे

पवनार : येथील वरुड शिवारात रेल्वे गेट जवळील शेतालगत असलेल्या नाल्यात ४ मोर मृतावस्थेत तर दोन गंभीर अवस्थेत आढळून आल्याची घटना रविवार सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

पवनार येथील सामाजीक कार्यकर्ते सतीश अवचत काही कामाकरीता या परिसरात गेले असता त्यांना १ मोर गंभीर अवस्थेत दिसुन आला त्याला उडता येत नसल्याचे दिसुन आला त्यानंतर काही वेळातच दुसरा मोर काही अंतरावर दिसला याची माहिती त्यांनी वनविभागाला दिली वनविभागाच्या कर्मचार्यांनी लगेच घटनास्थळ गाठून गंभीर अवस्थेत असलेल्या दोन मोरांना उपचाराकरीता पिपल फॉर अँनिमल्स यांचाकडे उपचाराकरीता पाठविण्यात आले.

त्यानंतर परिसर शोधुन काढला असता याच परिसरात आनखी तीन मृत व एक गंभीर अवस्थेत मोर दिसुन आला त्याला उपचाराकरीता पाठविण्याच्या आधीच त्या मोराचाही मृत्यू झाला अशा एकुन चार मोरांचा मृत्यूची घटना परिसरात घडली. यातील चारही मोरांना शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आले आहे. याचा रिपोर्ट आल्यानंतरच मोरांच्या मृत्यूचे सत्य बाहेर येईल या घटनेचा तपास उमेश शिरपुरकर क्षेत्र सहाय्यक वर्घा, एन एस राऊत वनरक्षक वर्धा (अतिरीक्त), एम एस माने वनरक्षक आंजी हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here