
वर्धा : त्रिनीवा कंपनीमार्फत चालविलेल्या अवैध मुरुमाचे उत्खनन व अवैध गिट्टी उत्खननाबाबत त्वरित चौकशी करून कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
वर्धा जिल्ह्यातून वर्धा ते आर्वी, अशा नविन सिमेंट रस्त्याचे बांधकाम जलद गतीने सुरू आहे. त्याकरिता ब-याच प्रमाणात मुरूम व गिट्टीचा वापर करणे संबंधित कंत्राटदारांमार्फत सुरू आहे. सिमेंट रस्त्याचे बांधकामाकरिता लागणारे मुरूम व गिट्टी याकरिता कंपनीला शासनाकडे त्याचा महसुल जमा करावा लागतो. त्यामध्ये नमुद रस्त्याकरिता किती प्रमाणात मुरूम व गिट्टी वापरण्यात आली. कंत्राटदाराला शासनाकडून त्या कामाचा बिल घेतेवेळेस आवश्यक असते.
सदर मुरूम व गिट्टी जेवढ्या प्रमाणात लागली असेल, त्याचा महसूलसुद्धा कंपनीला शासनाकडे नियमानुसार भरणा करणे गरजेचे असते. मात्र, रस्त्याच्या बांधकामाकरिता लागणारे कच्चे साहित्य व शासनाकडे बांधकाम कंपनीने जमा केलेली रॉयल्टी यात फार मोठी तफावत आढळून आली आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा संपूर्ण न्हास होत आहेत.
शासनाचासुद्धा मोठया प्रमाणात महसूल बुडत आहेत. त्यामुळे या कंपनीने शासनाचीसुद्धा फसवणूक केली असल्याने सदर त्रिनीवा कंपनीबाबत व सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामाची सखोल चौकशी व तपासणी करून सदर कंपनीचे बिले त्वरीत थांबविण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिका-यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खनिकर्म अधिकारी यांना निवेदनातून केली आहेत. निवेदन देतेवेळी शिवसेना शहर प्रमुख अँड. उज्वल काशीकर व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.