अज्ञात वाहनाने व्यक्‍तीला चिरडले! वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

समुद्रपूर : अज्ञात वाहनाने व्यक्‍तीला चिरडल्याने जागीच मृत्यू झाला. मृतदेहावरून वाहने गेल्याने मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत रस्त्यावर पडून होता. हा अपघात संताराम हॉटेलजवळ नागपूर महामार्गांवर १ रोजी रात्रीच्या सुमारास झाला. जाम-नागपूर महामार्गावर एका अज्ञात वाहनाने व्यक्‍तीला चिरडले, व्यक्तीचा मृतदेह रस्त्याववच पडून असल्याने मृतदेहावरून आणखी काही वाहने गेल्याने मृतदेह छिन्नविछिन्न रस्त्यावर पडलेला होता, याची माहिती समुद्रपूर पोलिसांना मिळाली असता, पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास अपघातस्थळी जात पाहणी केली.

अज्ञात व्यक्तीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत विखुरलेला दिसून आला. त्यामुळे मृतकाची ओळख पटली नाही. अज्ञात वाहनाने व्यक्‍तीला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांनी घेतली असून, अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. समुद्रपूर पोलिसांनी मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला असून अज्ञात वाहनचालकाचा शोध पोलीस घेत. असल्याची माहिती समुद्रपूर पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here