रॉकेल टाकून पानटपरी जाळली! दोन हजार रुपयांचे नुकसान

वर्धा : रॉकेल टाकून पानटपरीला आग लावल्याने टपरीवरील लाकडी बल्ल्या जळून खाक झाल्या. ही घटना नागसेन नगर परिसरात घडली. दिलीप श्याम तेलंग याचा पानटपरीचा व्यवसाय आहे. रात्रीच्या सुमारास मुन्ना शेंद्रे याने प्लास्टिक बाटलीत रॉकेलसारखा ज्वलनशील पदार्थ टाकून पानटपरीला आग लावली. यात तट्यावर झाकलेल्या लाकडी बल्ल्या जळून खाक झाल्या. यात त्याचे दोन हजार रुपयांचे नुकसान झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here