
सेलू : नागपूर येथील सोनेगाव पोलिस ठाण्यांतर्गत पोलिस निगराणीतून फरार असलेल्या आरोपीला सिंदी रेल्वे पोलिसांनी सापळा रचून नवरगाव (खडकी) येथून मोठ्या शिताफीने अटक केली आहे. नागपूर शहरांतर्गत येणाऱ्या सोनेगाव ‘पोलिस ठाण्यात पीसीआरवर असलेला आरोपी पंकज उरकुडे (20) रा. बेळतरोडी हा पोलिसाच्या हातावर तुरी देऊन बुधवारी फरार झाला होता.
तो सिंदी रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याची गुप्त माहिती सिंदी पोलिसांना मिळताच वर्धा नागपूर रोडवरील नव्याने वसलेल्या नवरगाव (खडकी) येथे सापळा रचून मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली. ही कारवाई सिंदी रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पोलिस हवालदार प्रकाश मैंद, जावेद धामिया, सतीश हांडे, सपाटे यांनी केली.




















































