भरधाव ट्रकच्या धडकेत गायीचा मृत्यू! चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा : भरधाव येत असलेल्या ट्रक क्रमांक एम. एच. 29 टी 1385 च्या चालकाने ट्रक निष्काळजीपणे चालवून रोडच्या बाजूने असलेल्या गायीला ठोस मारल्याने गायीचा मृत्यू झाली. ही घटना मौजा वायगाव-हळद्या रोडवर घडली. यातील फिर्यादी हा आपल्या तीन गायी चारून घरी जात असताना सायंकाळी 5.45 वाजताच्या दरम्यान ट्रकचालकाने तीन पैकी एका गायीला ट्रकने ठोस मारली. गाय गंभीर जखमी झाल्याने तिचा म्रुत्यू झाला. या प्रकरणी सचिन बंडुजी मुडे रा. वायगाव ता. समुद्रपूर याच्या फिर्यादीवरून टूक क्रमांक एम.एच. 29 टी 1385 च्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here