
समुद्रपूर : माझ्या मित्राला का हटकले, असे म्हणत तिघांनी युवकास रॉडने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जखमी केले. जाम येथे ही घटना घडली.
गोलू उर्फ सूरज साटोणे हा जाम परिसरातील मंदिराजवळ उभा असताना बंटी किटे, सया किटे, अरुण किटे यांनी गोळूला तु बंटीला का हटकले होते, या कारणातून वाद करीत तिघांनी रॉडने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी समुद्रपूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.


















































