ओटीपी क्रमांक विचारुन महिलेची एक लाख ९५ हजारांनी फसवणुक! पोलिसात गुन्हा दाखल

वर्धा : शहरातील सिव्हील लाईन परीसरातील शासकीय वसाहतीत वास्तव्यास राहनार्‍या वर्षा मोरे यांना ओटीपी क्रमांक विचारुन अज्ञात इसमाने ऑनलाईन त्यांच्या खात्यातून तीनदा ट्रान्झेकशन करीत एक लाख ९५ हजारांची रक्कम दुसर्‍या खात्यामध्ये वळती करून फसवणुक केल्याची घटना सोमवार (ता. १५) घडली पीडित महिलेने वर्धा शहर ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास शहर पोलिस करीत आहे.

वर्षा मोरे यांना ८७८८४९७६८० क्रमांकावरुन (ता.१५) मार्च रोजी दुपारी ११ वाजताच्या सुमारास अज्ञात इसमाचा कॉल आला व त्याने मी एसबीआय बॅकेमधून बोलत असून तुमचे आधारकार्ड तसेच पॅनकार्ड अपडेट करायचे आहे. तरी आपल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी नंबर सांगा असे म्हटले त्यानंतर वर्षा मोरे यांनी संबंधित ओटीपी त्यांना सेंड केला. त्यांनतर लगेच त्यांच्या खात्यातून पहीले ट्रान्झेकशन एक लाख ५० हजार, दुसरे २० हजार व तीसरे २५ हजार दुसर्‍या खात्यावर ऑनलाईन वळते करण्यात आले.

वर्षा मोरे ह्या बालविकास कार्यालयामध्ये कर्तव्यावर आहे. त्यांनी या संदर्भात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास शहर पोलिस करीत आहे.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here