येरला येथे “द बर्निंग ट्रकचा थरार! ट्रकसह लाखो रुपयांचे कापड जळून खाक

येरला : चालत्या ट्रकला अचानक आग लागून ट्रकसह आतील कपडे जळून खाक झाल्याची घटना हिंगणघाट तालुक्यातील नागपूर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वरील येरल्याजवळील वर्धा नदीच्या पुलाजवळ मंगळवारी उघडकीस आली. आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार नागपूर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरून ट्रक जात असताना ट्‌कने अचानक पेट घेतला. यावेळी चालकाच्या ही बाब निदर्शनास येताच चालकाने चालत्या ट्रकमधून उडी घेतल्याने सुदैवाने चालक सुखरूप बचावला. यावेळी ट्रकने पेट घेतल्याने ट्रकमधील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here