
पवनार : येथील पत्रकार सतिश नारायणराव अवचट यांना आज ता. 20 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मदत सामजीक संस्थेच्या वतीने पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी केल्याबद्दल देण्यात आला.
सतिश अवचट यांचे पत्रकार शेत्रात मागील 14 वर्षापासून सुरू असलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेवून मदत संस्थेने 2020 या वर्षीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकार पुरस्कार सतीश अवचट यांना गिरिश पांडव, नामदार डॉ. नितीन राऊत उर्ज्यामंत्री महाराष्ट्र राज्य, अभिजित वंजारी, तानाजी वनवे, दीनानाथ पडोळे, विजय आंभोरे, हर्षला मनोज साबळे, तसेच मदत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रा. प्रकाश सोनक, सचिव दिनेशबाबु वाघमारे यांच्या हस्ते देण्यात आला.