
वर्धा : कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्थानिक मोरांगना–खरांगना येथील इंडियन इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता १ ते ५ वीच्या विद्यार्थ्यांनी शनिवार, दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कृतियुक्त उपक्रम राबवले.
यावेळी विद्यार्थ्यांनी “अंधश्रद्धा सोडा, स्वच्छता राखा, मुलांना शिक्षण द्या, गोरगरीबांची सेवा करा, अनाथ-निराधारांना मदत करा” या गाडगेबाबा यांच्या विचारांवर आधारित घोषवाक्ये दिली. स्पर्श राजूरकर, शिवांश महल्ले, विहान काळे या विद्यार्थ्यांनी गाडगेबाबा यांची वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यासोबतच चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश देत गावातून स्वच्छता रॅली काढून कर्मयोगी गाडगेबाबा यांना कृतियुक्त अभिवादन केले. या उपक्रमाचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत व कौतुक केले.
या कार्यक्रमास संस्थेचे कोषाध्यक्ष सक्षम राईकवार, शाळेच्या प्राचार्या तृप्ती राईकवार, पर्यवेक्षिका विजया गेडाम तसेच शिक्षिका हिना शेख, निकिता तुमडाम, शबनम शेख, आराधना बघेल, आचल बत्रा, सपना मांढरे, दीपाली चहांदे, सविताताई विरखेडे, प्रियंकाताई वाघमारे, देवानंद भोयर, आकाश पारिसे, देवेंद्र चतुरकर, अतुल देऊळकर, धम्मा जुनघडे आदी उपस्थित होते.




























































