पाच प्रकरणे उघडकीस! बोगस पीक कर्ज प्रकरण; आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता

योगेश कांबळे

देवळी : शेती संबंधित बोगस कागदपत्रे तयार करुण पिककर्जासाठी बँकेला गडविणार्या आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याचे तपास अधिकारी देवळी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांनी सांगितले आहे.
सध्या सहा आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. पोलिसांनी मास्टरमाईड संगणक चालक आकाश खंडातेला अटक केली असून बनावट सात बार्यावर मारलेले तलाठ्यांचे शिक्के हे बनावट असल्याचे तपासणीत दिसून येत आहे. तलाठ्यांचे हस्ताक्षर नमुने नागपूरला तपासणी करीता पाठविले असून याची प्रकीया सुरु आहे. तलाठ्यांचे सध्या दोष दिसून येत नसून तलाठ्यांच्या सह्या सुद्धा आकाश खंडाते यांनीच केल्या असल्याचे संशय आहे. कागदपत्राच्या आधारे स्थानिक कँनरा बँकेकडुन पिक कर्जाची उचल करणार्या तीन आरोप शुक्रवारी तसेच या प्रकरणात मुख्य सुत्रधाराची भुमिका बजाविणार्या उर्वरित तिघांना शनिवारच्या रात्रिला अटक करण्यात आली. यामध्ये मास्टरमाईड संगणक चालक आकाश खंडाते रा. देवळी राजू किसना आत्राम व वसंता चंद्रभान डबले दोघेही रा. बोपापुर (दिघी) यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा मास्टरमाईड संगणक चालक आकाश खंडाते असून त्याच्यावर याआधी शासकीय खोटे दस्तवेज तयार केल्याचे गुन्हे दाखल असल्याचे पोलीसांनी सांगीतले. पोलिस कोठडी दरम्यान आरोपीकडुन बोगस प्रकरणे उजेडात येत आहे.
अमोल रामदास बावणे (वय ३५) राहणार बोपापुर (दिघी) व विजय विनायक गेडाम (वय ३०) राहणार बोपापूर (दिघी) यांचे कडे शेती नसताना अमोल बावणे यांनी बॅंक ऑफ बडोदा मधून एक लाख रुपयांची उचल केली. तर विजय गेडाम यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्र मधून ६६ हजार रुपयांची उचल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांनी दोघांना तपासात घेतले विचारपुस सुरू आहे. सध्या पाच प्रकरणे उघडकीस आले असून मागील वर्षीचे तीन तर यावर्षीचे दोन प्रकरणाचा समावेश आहे. पोलीस योग्य दिशेने तपास करीत असून
आरोपिंची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here