
दिलीप पिंपळे
आकोली : देशात सर्वत्र कोरोंना साथ रोगाने थैमान घातले असून लाखों लोकांना याची लागण झाली आहे यामुळे सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास व बहुसंखेने नागरिक एकत्र येण्यास शासणाने मनाई केली आहे. देश इंग्रजांच्या गुलामगिरीत असताना नगरिकाना एकत्र येण्यास व जमाव करण्यास त्या काळी बंदी घालण्यात आली होती त्याकाळी लोकमान्य टिळक यांनी सर्वजनिक गणेश उत्सव सुरू केला, त्यांनी सुरू केलेली सार्वजनिक गणपतीची संकल्पना इंग्रज विरुद्ध जमाव एकत्रीत करून लढा देण्यासाठी उभारण्यात आली होती यामुळे गावागावात सामूहिक गणपतीची स्थापना होऊन या निमित्ताने गावात एकोपा निर्माण होत होता व सर्व जाती धर्माचे गरीब श्रीमंत नागरिक या उत्सवात एकत्र येऊन सहभाग घेत होते. कीर्तणे भजन स्पर्धा गीत गायन स्पर्धा अश्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून स्थानिक लोकांचे प्रबोधन करण्यात येत होते परंतु देशात करोना साठीच प्रादुभाव झाल्याने व यात लाखों लोकांना प्रादुर्भाव झाल्याने सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घातल्याने स्वतंत्र काळापासून असलेली परंपरा खंडित झाली आहे. परंतु शासनाच्या नियमचे पलनही व्हावे व परंपरा ही व्हावी या उद्देशाने येळकेळी येथील भांडेकर ले आउट वर्ड क्र ४ मधील अंकित उरकुडे, प्रणय पिंपळे, साहिल वासकर, सोहम उरकुडे, पीयूष खोबे, संस्कार भांडेकर, यश भांडेकर, पीयूष बुधबावरे, सुजुल बोटारे या चिमूकल्यानी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मारुती ओमनी कारमध्येच श्री गणेशची स्थापना केली असून मनोभावे पूजा अर्चना आरती ही चिमुकले करीत आहे. या चिमूकल्यानचे गावकऱ्यांनी कवतुक केले आहे .