सांगा कसा होणार नाही स्तनदा माता अन् नवजात शिशूंना कोरोना विषाणूचा संसर्ग? नवजात शिशू कक्षात गर्दी; विनामास्क वावर धोक्याचा: रुग्णालयाची सुरक्षा वाऱ्यावर

आर्वी : येथील उपजिल्हा रूग्णालयातील नवजात शिशू कक्ष, महिला कक्षासह सामान्य विभागात मोठी गर्दी होत असल्याचे दिसून आले. इतकेच नव्हेतर नवजात शिशू कक्षात पुरुषांचा वावर राहत असल्याने स्तनदा माता आणि नवजात शिशूंना कोरोनाचा धोका होण्याची शक्यता बळावी आहे. मात्र, हे सर्व डॉक्टरांच्या नजरेआड होत असल्याने रूग्णालयाची सुरक्षा वाऱ्यावर आल्याचे दिसून आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रूग्ण तपासणीपासून तर इतर बाह्यरूग्ण, आंतररूग्णांसह सामान्य रूग्णांची उपजिल्हा रूग्णालयात मोठी गर्दी असते. आर्वी भागातीलच नव्हेतर इतर तालुक्यासह जिल्ह्यातून अनेक रूग्ण तपासणीला येतात. परंतु, डॉक्टरांच्या नजरेआड अनेक वॉर्डांमध्ये मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात नवजात शिशू कक्ष, महिला वार्ड आहे. मात्र शिशू व महिला वॉर्डात मोठी वर्दळ होत असल्याने कोविडचा धोका बालकांना होण्याची भीती व्यक्त होत आहे.

इतकेच नव्हेतर महिला आणि शिशू कक्षात नेहमीच पुरुषचा विनामास्क वावर असल्याने शिशुना स्तनपान करताना स्तनदा माता संकोच करीत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे डॉक्टरांच्या उपस्थितीतपर्यंत सर्व व्यवस्थित असते. पण, सायंकाळी पाच वाजतानंतर शिशू कक्षात मोठी गर्दी होते. त्यामुळे विषाणू संक्रमण वाढण्याची शक्यता आहे. नुकतीच दोन दिवसांपूर्वी केंद्रीय पथकाने उपजिल्हा रूग्णालयालची तपासणी केली असून या बाबीकडे गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here