
मयुर अवसरे
विजयगोपाल : नजीकच्या तांबा ग्रामपंचायतीची करावे तेवढे कौतुक कमीच आहे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आपली पाठ थोपटून घेण्याचा मानस या ग्रामपंचायतीने केला असून विजयगोपाल आरोग्य वर्धनी केंद्रापासून सहा किलोमीटर अंतरावर आपले गाव असल्यामुळे या गावातील ग्रामपंचायतीने नागरिकांना कोरोना लसीकरण करण्याकरिता मोफत वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली असून त्यामुळे या ग्रामपंचायतीने 287 नागरिकांपैकी 260 नागरिकांना कोरोना लसीकरण करून घेतले आहे.
या मोफत वाहतुकीकरिता वाहनांची सोय उपलब्ध करून देण्याकरिता निधीची कुठलीही कमतरता पडणार नाही असे येथील सरपंच शालूताई येंडे यांनी सांगितले. सुरूवातीला जिल्हाबंदी असताना दंड आकारण्यात आलेला निधी आपत्ती व्यवस्थापन नावाच्या खात्यात जमा करून ठेवला होता याच खात्यातून त्यांनी कोरोना लसीकरणा करता करण्याकरिता नागरिकांना मोफत वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सरपंच शालूताई येंडे यांनी सांगितले म्हणूनच या ग्रामपंचायतींनी जिल्हाधिकारी यांनी घोषित केलेल्या 100% लसीकरण करणाऱ्या ग्रामपंचायती करिता पाच लाख रुपयांचे रोख पारितोषिक मिळविण्याचा मानस पूर्ण करण्याच्या उद्दिष्टपूर्ती कडे आपली वाटचाल केली आहे.
परंतु शेवटचा टप्पा राहिला असताना लसीकरण करिता, लसच उपलब्ध नसल्यामुळे लसीकरणाच्या टप्पा पूर्ण होण्याच्या जवळ जवळ आहे या लसीकरण पूर्णत्वास नेण्याकडे या गावच्या आशा सेविका हर्षला डवरे या गावच्या सरपंच शालूताई येंडे या गावचे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजेश नंदागवळी या गावचे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक किशोर गायधने आणि या गावातील सामाजिक कार्यकर्ते आशिष येंडे यांचे मोलाचे योगदान असल्याचे बोलले जात आहे.
विजय गोपाल आरोग्यवर्धिनी केंद्र अंतर्गत येत असलेल्या तांबा ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम समोर आला आहे या ग्रामपंचायतीने नागरिकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन नागरिकांना आरोग्य वर्धनी केंद्रापर्यंत पोहोचण्या करिता लस घेण्याकरिता मोफत वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली असून त्यामुळे आरोग्य लसीकरणाचा टप्पा उद्दिष्टपूर्ती कडे वाटचाल करीत आहे या मोफत वाहन सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा व आपले आरोग्य चांगले रहावे याकरिता लस घ्यावी असे आवाहन तांबा गावचे सरपंच यांनी केले आहे.
प्रतिक्रिया….
अशा बिकट परिस्थितीत शासनाने कोरणा प्रतिबंधक लसीचे उपलब्ध करून दिल्यामुळे त्याचा लाभ सर्व नागरिकांना त्वरित मिळावा याकरिता आम्ही नागरिकांना आरोग्य वर्धनी केंद्रापर्यंत, पोहचविण्याकरीता मोफत वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सर्वांचे आरोग्य हेच सध्या आमच्या ग्रामपंचायतीचे प्रथम कर्तव्य आहे.
सरपंच, शालूताई येंडे ग्रामपंचायत तांबा
















































