वाहनांचे टायर, स्टेपनी चोरणाऱ्या ठोकल्या बेड्या

वर्धा : बाजार समितीत नादुरुस्त वाहनांचे पार्टस चोरून नेणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. वैभव काकडे, सचिन जोगे असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

चंद्रशेखर काकडे याच्या मालकीच्या चारचाकी वाहनात बिघाड झाल्याने त्याने बाजार समितीच्या कार्यालयालगत वाहन उभे करून ठेवले होते. अज्ञाताने वाहनाची स्टेपनी, नवीन टायर आदी साहित्य चोरून नेले होते. याप्रकरणी शहर ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करीत वैभव काकडे, सचिन जोगे यांना ताब्यात घेत अटक केली.

त्यांच्याकडून टायर डिक्ससह नवीन टायर-ट्यूब तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ४१ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, ठाणेदार नीलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात संतोष दरगुडे, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, राजेश तिवस्कर, प्रदीप वाघ, मनीष कांबळे, नवनाथ मुंडे, गोपाळ बावणकर यांच्यासह सायबल सेलने केली.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here