आकाशात उल्कापिंडाप्रमाणे चमकणारी घटना घडली! अनेकांनी अनुभवली ही नैसर्गीक घटना; नेमक काय याबाबत सभ्रम कायम

राहुल खोब्रागडे

वर्धा : अचानक आकाशात मिसाईलप्रमाणे दिसणारी उल्कापिंडासारखी चमकणारी वेगाने वस्तू पृथ्विच्या दिशेने येण्याची चमत्कारीक दुर्मीळ घटना घडली. ही घटना शनिवार (ता. २) सायंकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास ही घटना आकाशात घडली असल्याने अनेकांनी या घटना आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिली मात्र हे नेमक काय आहे याचा अद्याप कोणताच निष्कर्ष लागलेला नाही. याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम कायम आहे.

रॉकेटसारखी चमकणारी मिसाईलप्रमाणे जाणारी ही नैसर्गीक घटना घडल्याचे दृष्य महाराष्ट्ररातील अनेक जिल्ह्यात एकाच वेळी दिसली त्यामुळे अनेकांनी आपापल्या पद्धतीने अनेक कयास यावेळी लावले. रशिया आणि यूक्रेनचे युद्ध चालू आहे आणि त्यातील मिसाईल चूकुन आपल्या देशात आले असाही निष्कर्ण काहिंनी काढला तर काहिंणी हा उल्कापिंड असल्याचे सांगितले. अनेकांनी ही दैवि घटना तर अनेकांनी ही अशुभ घटना असल्याचे मत व्यक्त केले. मात्र ही घटना नेमकी काय अस प्रश्न आता अनेकांना पडलेला आहे.

आकाशात घडलेली ही घटना अनेकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली किमान पाच मिनीटे हे दृष्य आकाशात पाहायला मिळाले त्यामुळे अनेकांना या नैसर्गीक घटनेते आनंद लूटला तर अनेकांना या घटनेने आश्चर्यचकीत केले. मात्र ही एक नैसर्गीक घटना असल्याचे बोलल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here