४,८०० रुपयांची रेल्वेची आरक्षित तिकिटे जप्त! रेल्वे सुरक्षा बलाने केली कारवाई

वर्धा : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाल्याने रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी निरीक्षक विजय त्रिपाठी यांच्या नेतृत्वात शहरातील मैत्री कॉम्प्युटर शॉपवर छापा मारून जुन्या आरक्षित ई-तिकिटे जप्त केली. शहरातील जुन्या वस्तीत असलेल्या मैत्री कॉम्प्युटर शॉपमधून तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाल्याने रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी छापा मारला असता, रमेश विलास ताकसांडे रा. अंबुलकर ले आउट याची विचारपूस करुन तपासणी केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

त्याच्या दुकानातून १० नग ४ हजार ८४८ रुपये किमतीच्या ई तिकीट, लॅपटॉप 3० हजार रुपये असा एकूण ३४ हजार ८४८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला, त्याच्या दुकानाची तपासणी केली असता दोन पर्सनल आयडी मिळून आले. पुढील तपास उपनिरीक्षक विनोद मोरे यांच्या नेतृत्वात सुरु आहे. ही कारवाई वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्‍त आशुतोष पाण्डेय, कोटा जोजी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here