पवनारात जूगार अड्ड्यावर छापा! रोख रकमेसह जूगार अटकेत

पवनार : येथे गेल्या अनेक दिवसापासुन चालू असलेल्या जूगार अड्ड्यावर आज पोलिसांनी अचानक झापेमारी केली यात पंधराच्या जवळपास जूगाांना रोख रकमेसह पोलिसांनी ताब्यात घेतले.

पवनार येथे सेवाग्राम रोडलगत असलेल्या हिवरे यांच्या घरी किरायाने रुम करीत सट्टा पट्टीचा व्यवसाय थाटण्यात आला होता. राजरोसपने हा व्यवसाय चालू होता त्यामुळे परिसरातील नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता मात्र याकडे पोलिसांच दुर्लक्ष होते.

मात्र आज अचानक दुपारी पाच वाजताच्या सुमारास पोलिसांनी या सट्टा पट्टी धाड टाकत कारवाई केली यात पंधराच्या जवळपास जूगारांना अटक करुन लाखो रुपयांची रक्कम जप्त केल्याची माहिती आहे. मात्र रात्री उशीरापर्यत कारवाई सुरु असल्याने जूगारांची नावे आणि रोख रकमेची माहिती मिळाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here