बाजारातून महिलेची पर्स चोरी! रोखेसह दागिने ल॑पास; महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण

वर्धा : बाजारात खरेदी करण्यासाठी गेलेल्या महिलेची दागिने असलेली पर्स चोरट्याने चोरुन नेली. टिळक चौक परिसरात ही घटना घडली. माधुरी महादेव गजभिये या धान्य खरेदी करण्यासाठी बाजार परिसरात गेल्या होत्या.

दरम्यान त्या टिळक चौकातील चपलेच्या दुकानात थांबल्या असता तेथे गर्दी असल्याने बांगड्या घेतल्या. त्याला पैसे देण्यास पर्स पाहिली असता पर्स दिसली नाही. अज्ञात चोरट्यांनी पर्स चोरुन नेली असून पर्स मध्ये ९ हजार ५०० रुपये रोख, सोन्याचे कानातले असा एकूण २९ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहे. दोन दिवसांपूर्वी बाजार परिसरातच एका महिलेची पर्स चोरी झाल्याची घटना घडली होती. यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here